Deepak Kesarkar : केसरकरांचा उद्धव ठाकरेंबाबत ‘तो‘ गौप्यस्फोट; शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

मंत्रि‍पदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी करण्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मंत्रि‍पदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी करण्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा सनसनाटी आरोप केल्याचे पाहायला मिळतंय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद देण्यासाठी पैसे मागितल्याचा सनसनाटी आरोप शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात मंत्रि‍पदासाठी पैसे मागितले होते. पण मागितलेले पैसे देणं शक्य नव्हतं असा दावा केसरकरांनी केला आहे. जमीन विकून पैसे देऊ असं त्यावेळी सांगितल्याचं केसरकरांनी सांगितलं आहे. शिंदेंनी मंत्री करताना कोणतेही पैसे घेतले नाही किंवा मागितले नाही. उद्धव ठाकरेंकडून त्यावेळी पैशांची मागणी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com