व्हिडिओ
Kirit Somaiya |बांगलादेशी रोहिंग्यांच्या घुसखोरीबद्दल किरीट सोमयांचा मोठा गौप्यस्फोट!
किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्यांच्या घुसखोरीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. दोन राजकीय नेते या कारस्थानात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बांगलादेशी रोहिंग्यानी भारतात घुसखोरी केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे. त्यांच्याकडे बोगस जन्म प्रमाणपत्र देखील आढळून आले. याबाबत जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात करण्यात आलेल्या अर्जां बाबत चर्चा करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कल्याणमध्ये तहसीलदारांची भेट घेतली.
यावेळी बोलताना कल्याण तहसील कार्यालयाकडून साडेबाराशे मधून जवळपास साडेसहाशे अर्ज बाद करण्यात आल्याचे तहसीलदाराने सांगितले. तसच किरीट सोमय्या यांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र देताना सर्व प्रकाराची चौकशी करून अर्ज स्वीकारा अशी सूचना तहसील विभागाला केली आहे. तसच एक गौप्यस्फोट देखील केला आहे. बांगलादेशी रोहिंग्याना भारतीय बनवण्याचा कटकारस्थान करण्यात दोन राजकिय नेते सहभागी असल्याच ते म्हणाले आहेत.