Kirit Somaiya मालेगावात आणखी मोठा घोटाळा उघड करणार?

भाजप नेते किरीट सोमय्या मालेगावात आणखी मोठा घोटाळा उघड करणार असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे.
Published by :

मालेगावमध्ये आणखी एक मोठा स्कॅम उघड करणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. किरीट सोमय्या शुक्रवारी मालेगावमध्ये जाणार आहेत. त्याचबरोबर बेरोजगार तरुणांच्या नावाने बनावट अकाऊंट आणि बँकेत कोट्यवधींच्या फसवणुकीचे प्रकरण किरीट सोमय्यांनी उचलून धरलं. आता मालेगावात नवीन घोटाळा उघड करण्यासाठी सोमय्या उद्या मालेगावात जाणार आहेत.

किरीट सोमय्या यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आपण मालेगावात आणखी एक मोठा घोटाळा उघड करणार आहोत. आपण उद्या मालेगावात जाणार असल्याचं त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. पाहा किरीट सोमय्या यांची पोस्ट-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com