Kokan Railway : लांबपल्याच्या ट्रेन रद्द; कोकण रेल्वेची सेवा अद्यापही सुरळीत नाही

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रात्री पासून गोव्याला जाणारी वाहतूक ही ठप्प झाली आहे. या पावसाचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची सेवा अद्यापही सुरळीत झाली नाही आहे. यामुळे या मार्गावरील लांबपल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आले आहेत.

मात्र, मुंबईकडे जाणारी तुतारी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकातून निर्धारित वेळेत सुटणार आहे. पेडणे बोगद्यात युद्धपातळीवर काम सुरु असून उद्यापासून कोकण रेल्वे सेवा सुरळीत होईल, अशी माहिती समोर येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com