Devendra Fadnavis: म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

नागपूरमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
Published by :
Team Lokshahi

नागपूरमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. बहिणींच्या खात्यात पैसे आल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. देवा भाऊ आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही असं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

योजना बंद करण्यासाठी कॉंग्रेस कोर्टात गेल्याच ही देवेंद्र फडणवीांनी म्हटलं आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी आमच्या या योजना आहेत इतिहास बदलण्याची ताकद महिलांमध्ये आहे. तर महिला विकसित झाल्या तरचं देश विकसित होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच महाराष्ट्रमध्ये 1 कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार असल्याच देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com