Nagpur: मनपाची 140 कोटींची जमीन भूखंड पाडून परस्पर विकली, 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 140 कोटी रुपयांच्या जागेची अवैध विक्री सुरु आहे. मनपाच्या तक्रारीच्या आधारावर वाठोडा पोलिसांनी 10 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Published by :
Team Lokshahi

नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 140 कोटी रुपयांच्या जागेची अवैध विक्री सुरु आहे. मनपाच्या तक्रारीच्या आधारावर वाठोडा पोलिसांनी 10 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तरोडा खुर्द येथील मनपाच्या जमिनीचे प्लॉट पडून त्यांची अवैद्यरीत्या विक्री केली आहे. नत्थू जागो गिरीपुंजे, धनराज जागो गिरीपुंजे, सजाबाई जागो गिरीपुंजे, मनोहर जागो गिरीपुंजे, लक्ष्मीबाई फत्तु गिरीपुंजे, प्रभाकर फत्तु गिरीपुंजे, श्रीमती अनिता अशोक कापसे, वनिता फत्तु गिरीपुंजे, सविता फत्तु गिरीपुंजे आणि स्नेहल डेव्हलपर्स ॲण्ड बिलडर्सचे मालक विलास तुकारामजी सातपुते, विरोधात गुन्हा दाखल केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com