Mumbai Local Train : मुंबई आणि कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत

मुंबई आणि कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Local Train) मुंबई आणि कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्या ऑटोमॅटिक पद्धतीने थांबत आहेत.

त्यामुळे बदलापूरहून कर्जत कडे जाणाऱ्या लोकल रखडल्या आहेत. अप दिशेकडील वाहतुकीवर याचा परिणाम होत असून दोन्ही दिशेकडील वाहतूक खोळंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झालेत.

Summery

  • मुंबई आणि कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत

  • वांगणी-बदलापूर दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे रेल्वेचा खोळंबा

  • बदलापूरहून कर्जत दिशेला जाणाऱ्या लोकल रखडल्या

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com