Maghi Ganesh Jayanti 2024: माघी गणेशोत्सव, गणपती मंदिरात भाविकांची गर्दी, भाविकांच्या प्रतिक्रिया

गणेश जयंतीनिमित्त पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.
Published by :
Team Lokshahi

गणेश जयंतीनिमित्त पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. यनिमित्त मंदिरात पाहटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं अयोजन करण्यात आलं होत. पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक कारण्यात आला. त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांनी आपली गायन सेवा श्रीगणेशाच्या चरणी अर्पण केली.

याशिवाय दिवसभर श्रीसुप्त अभिषेक, गणेश याग, नगर प्रदक्षिणा, आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. गणेशजयंती निमित्त मंदिर आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com