Mahaparinirvan Diwas: राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिवादन

Security Deployment: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.
Published by :
Dhanshree Shintre

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन सुरक्षितपणे व निर्विघ्नपणे पार पाडण्याकरीता मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. भीम अनुयायींचीही अभिवादनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केलं

वाहतुक नियमनाकरीता मुंबई पोलीस दलाकडून ०३ अपर पोलीस आयुक्त, ०८ पोलीस उप आयुक्त, २१ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह ४९२ पोलीस अधिकारी व ४६४० पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहेत.

त्यांचेसोबत महत्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी), दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, बीडीडीएस पथक तसेच होमगार्डस् असा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com