Maharashtra Agriculture: E- Pik पाहणी आता ऑफलाईन पद्धतीने होणार, विक्रमसिंह पाचपुते यांची मागणी मान्य
ई पीक पाहणी आता ऑफलाईन पद्धतीने करता येणार. नोंदणी न केलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आलेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली. १५ जानेवारी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
नाफेड खरेदी ही ई पीक पाहणी नुसार चालते. त्यामुळे आपल्या केंद्रावर खरेदी करता येत नाही. आपण तीनवेळा मुदतवाढ दिली आहे. तरीही शेतकऱ्यांनी पीकाचा फोटो काढून अपलोड करावा लागतो. त्यानंतर लोकल निरिक्षत अपलोड करतात. तरीही नोंद होत नाही हे सॉफ्टवेअर पुन्हा ओपन होत नाही.
यासाठी कृषी अधिकारी यांकडे १५ जानेवारी पर्यंत ऑफलाईन अर्ज करता येतील. त्या तक्रारींचे निवारण करून पंचनामा करायचा आहे. खरिपाच्या काळात शेती होती का? त्यावर समिती आपला रिपोर्ट जिल्हाधिकारी यांना देईल. तिथून विभाग हा रिपोर्ट केंद्राला पाठवेल. व्यापारी या बाबीचा फायदा घेऊ शकतात, ही भीती आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नोंद व्यापारी करू शकतात, त्यावर लक्ष ठेवावे लागेल. अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
