Mahayuti Govt Formation | एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार? देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर

महाराष्ट्रात नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार की नाही यावर अद्याप स्पष्टता नाही.
Published by :
shweta walge

उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेल नाही.

आज भाजपकडून पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर देवेंद्र फडणवी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर पाऊण तास बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ सहभागाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की जाणार? हे पाहण महत्वाच ठरणार आहे.

दरम्यान, गृहखातं आपल्याकडेच ठेवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती आहे. मात्र एकनाथ शिंदेही गृह खात्यासाठी आग्रही असल्याची सूत्राची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com