Mahayuti Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी- सूत्र

नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता शपथविधी होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Published by :
Team Lokshahi

नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता शपथविधी होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, भाजपकडे मुख्यमंत्रिपद गेलं तर गृहखातं आमच्याकडे असावं हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे. कारण गेल्यावेळी उपमुख्यमंत्र्याकडे गृहखातं दिलं होते. त्याच पद्धतीने हे झालं पाहिजे. त्यामुळे आता कोणतं खातं कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com