Rahul Narwekar : राहुल नार्वेकरांचा मेल आयडी हॅक, मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाला आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मेलवरुन राज्यपालांना फेक मेल सुद्धा पाठवण्यात आला आहे.

राज्यपालांना पाठवलेल्या या ई- मेलमध्ये “काही आमदार जे सभागृहात नीट वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी," असा मजकूर लिहला असल्याचे सांगण्यात येत आहे. विधीमंडळात आमदार नीट वागत नसल्याने कारवाई करण्याचा मेलमध्ये उल्लेख केला आहे. मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com