Nashik Crime: नाशिकमध्ये ICICI होम फायनान्समध्ये मोठी घरफोडी

नाशिकमध्ये ICICI होम फायनान्समध्ये मोठा दरोडा पडला आहे.
Published by :
Sakshi Patil

नाशिकमध्ये ICICI होम फायनान्समध्ये मोठा दरोडा पडला आहे. लॉकरमधून 222 खातेदारांचे 5 कोटींचे दागिने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकरमधून 222खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आला असून गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास पाच कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक शहरातील डोंगरे वस्तीगृह चौकामध्ये तिसऱ्या मजल्यावर 24 तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे. या धक्कादायक घटनेने खाजगी बँका खाजगी लॉकर्स आणि त्यांची सुरक्षा ऐरणीवर आल्याचं समोर येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com