Rohit Pawar : 'शासकीय आश्रम शाळांमध्ये दूध पुरवठ्यात मोठा घोटाळा', आमदार रोहित पवारांचा मोठा आरोप

आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. शासकीय आश्रम शाळांमध्ये दूध पुरवठ्यात मोठा घोटाळा होत आहे असे रोहित पवार म्हणत आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. शासकीय आश्रम शाळांमध्ये दूध पुरवठ्यात मोठा घोटाळा होत आहे असे रोहित पवार म्हणत आहेत. दूध कंत्राटासाठी यावेळेस 80 कोटींची दलाली देण्यात आली. कोल्हापूरमधील एका नेत्याच्या कंपनीली कंत्राट दिला आहे तर आंबेगावातील एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

यावर रोहित पवार म्हणाले की, 5 कोटी 71 पॅकेट्स 200 एमएलचे हे द्यायचे असा करार तिथे केला गेला. त्याच्यात नाशिक 2 कोटा 60 लाख, ठाणे 1 कोटी 66 लाख पॅकेट्स अमरावती 88 लाख असं करुन एकूण 5 कोटी 71 लाख आहेत. तर सहज मी विचारलं की शेतकऱ्याकडून दूध किती रुपयाला घेतलं जातं तर एखादी चांगली कंपनी असेल, चांगल्या गुणवत्तेचं दूध 30 रुपयाला घेतलं जातं आणि त्याच्या गुणवत्तेमध्ये काही फरक असेल तर ते 24 पासून ते 30-31 पर्यंत आहे.

आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की शेतकऱ्याला 5 रुपये बिना अटी देण्यात यावे यासाठी आम्ही लढलो, भांडलो. भांडल्यानंतर अटी काढण्यात आल्या अजूनपर्यंत 5 रुपयांचा अनुदान शेतकऱ्याला मिळाला नाही. 165 कोटी आणि 85 कोटीत बसायला पाहिजे होते तर दलाली 80 कोटी रुपयाची दिली गेली. आंबेगावातील एका खासगी कंपनीसोबत करार केला गेला असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com