व्हिडिओ
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; 'या' महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; ठाकरे गटाच्या संजना घाडी करणार शिंदे गटात प्रवेश.
विधानसभा निवडणूकीमध्ये महायुती सरकारला यश आले. त्यानंतर इतर पक्षातील कार्यकर्ते महायुतीमध्ये प्रवेश घेत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या संजना घाडी या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. आज दुपारी १ वाजता मुक्तगिरी बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजना घाडी यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे.