Uday Samant : 'नो कॉम्प्रोमाईझ ! अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे पोलिसांना निर्देश
रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करायचा आहे. त्यासाठी कोणतीही तडजोड न करता अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाईची मोहिम सुरु करावी. याचपार्श्वभूमीवर राज्याचे पालमंत्री डॉ. उदय सामंत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे.
डॉ. उदय सांमत म्हणाले की, "अंमली पदार्थांच्या सेवनासंदर्भातल्या ज्या काही तक्रारी येत आहेत. त्याच्यावर ठोस भूमिका पोलिस प्रशासानाने त्याचबरोबर जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांनी घेतल्या पाहिजे. या संदर्भातल्या सूचना देण्यासाठी आमची बैठक होती. अमंली पदार्थांचे जिल्ह्यातून नामोनिषाण मिटलं पाहिजे. यासाठी कशा पद्धतीने कारवाई करायची यासंदर्भाचे नियोजन देखील पोलिसांनी करावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत. आमचा असा प्रयत्न राहिल की, अमली पदार्थांच्या विळख्यातून सुटलेला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा रत्नागिरी असेल अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी काम करावे. अशा सुचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत".