व्हिडिओ
Manmohan Singh Funeral: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने जगभरातील नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिल्लीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. सकाळी काँग्रेस मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने अवघा देश जणू स्तब्ध झाला आहे. अवघ्या जगभरातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत असून जगभरातील प्रमुख नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. सिंग यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार होतील.
त्यापूर्वी, सकाळी साडे आठ ते साडे नऊ या वेळेत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात येईल. तेथे सामान्य नागरिक डॉ. सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊ शकतील. त्यानंतर सकाळी साडेनऊला अंत्ययात्रा निघेल. डॉ. सिंग यांच्या पार्थिवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेकांनी अंतिम दर्शन घेतले.