Manoj Jarange Patil : राजकीय पोळी भाजू द्यायची नाही मनोज जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर निशाणा

मनोज जरांगे पाटलांनी रायगडावर शिवरायांना अभिवादन करुन आपण 70 टक्के लढाई जिंकली असा विश्वास व्यक्त केला आहे.
Published by :
Team Lokshahi

मनोज जरांगे पाटलांनी रायगडावर शिवरायांना अभिवादन करुन आपण 70 टक्के लढाई जिंकली असा विश्वास व्यक्त केला आहे. रायगडच्या महाडमधून जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला इशारा देत, मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या असा इशारा सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे त्यांनी भांडणं लावली तरी ओबीसी बांधवांशी वाद घालायचा नाही, एकाच माणसाचा मराठा आरक्षणाला विरोध असल्याच म्हणत भुजबळांवर निशाणा साधला आहे. विजय आपलाच होणार, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त करत मराठ्यांविरोधात गनिमी कावा सुरू असल्याच त्यांनी म्हटंल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com