Maratha Reservation : आम्हाला तुमचं चॅलेंज...; जरांगेंचा भुजबळांना प्रत्युत्तर

छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. यावर आता जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.

पिंपरी : छगन भुजबळ यांनी कुठेही आंदोलन करू द्या, कोणी भूमिका बदललेली नाही, सर्व सुरळीत होईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनानंतर परत निघालेल्या जरांगे पाटील यांनी पिंपरी चिंचवड जवळ मोशी इथ मुक्काम केला होता. त्यानंतर अंतरवालीकडे जात असाताना मनोज जरांगेंनी सर्व सुरळीत होईल आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल, असा दावा केला आहे.

नव्या कायद्यानुसार प्रमाणपत्र मिळाले की दिवाळी करणार असल्यातेही त्यांनी म्हंटले आहे. पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा घेणार असल्याचे जरांगेंनी जाहीर केले. येत्या 15 दिवसांत अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर होईल, असा विश्वास मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com