Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आजपासून मराठवाडा दौऱ्यावर

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आजपासून मराठवाडा दौऱ्यावर निघणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली आहे.

मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली असणार आहे. मनोज जरांगे मराठवाड्यातील मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगोलीतून मनोज जरांगे पाटील दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com