Marathi Bhasha: आपल्याच घरात हाल सोसते मराठी! 29 टक्के विद्यार्थ्यांना वाचता येईना मराठी

केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी प्राथमिक शिक्षणाचा पायाच कच्चा असल्याचे दिसते. प्राथमिक शिक्षणाचा पाया कच्चा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मराठी भाषेची बोंब
Published by :
Prachi Nate

केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जरी दिला असला तरी मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यांतील जि.प. शाळांमधील २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विभागीय प्रशासनाने केलेल्या एका पाहणीअंती ही बाब उघडकीस आली आहे.

लातूर आणि बीड या दोन जिल्ह्यांतील निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. तर इंग्रजी, गणितापासून तर विद्यार्थी चार हात लांब असल्याचे आढळले आहे. प्राथमिक शिक्षणाचा पायाच कच्चा असल्याचे यातून दिसते. धाराशिव जिल्ह्यातील भाषाज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. दुसरीतील ८६.८७, तर तिसरीतील ८७.५१ टक्के विद्यार्थ्यांना मोठी वाक्य वाचता येत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com