IFFI 54 : गोव्यातील ‘इफ्फी महोत्सवा’त मराठी चित्रपटांची वानवा

गोवा येथे होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेली काही वर्षे सातत्याने पाच ते सहा मराठी चित्रपटांची निवड होऊन ते दाखवले जातात.
Published by :
Team Lokshahi

गोवा येथे होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेली काही वर्षे सातत्याने पाच ते सहा मराठी चित्रपटांची निवड होऊन ते दाखवले जातात. यंदा 54 व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात निवड झालेल्या अधिकृत यादीत एकाही मराठी चित्रपटाला स्थान मिळालेले नाही. कथाबाह्य चित्रपट विभागातील तीन लघुपट सोडले तर चित्रपट विभागात एकाही मराठी चित्रपटाची निवड झालेली नाही. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांनी चित्रपटगृहांतही बऱ्यापैकी आर्थिक यश मिळवले आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातूनही मराठी चित्रपट सातत्याने पुरस्कार मिळवत आहेत. असे असूनही देशातील प्रतिष्ठित महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकाही मराठी चित्रपटाला मान्यता न मिळण्याची नामुष्की ओढवली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com