Solapur : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटणार; कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रकल्पाला गती

कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रकल्पाला गती मिळणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अधिकाऱ्यांनी या कामाची कामाची पाहणी केली आहे.
Published by :
Team Lokshahi

कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रकल्पाला गती मिळणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अधिकाऱ्यांनी या कामाची कामाची पाहणी केली आहे. महापुरात वाहून जाणारे 51 टीएमसी पाणी मराठवाड्यासह दुष्काळी भागाला मिळणार, अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. पावसाळ्यात सांगली सातारा कोल्हापूर भागातील महापुरात वाहून जाणारे पाणी पुणे, सोलापूर आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला देणाऱ्या कृष्णा खोरे फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टला एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या टीमने भेट देऊन संपूर्ण कामाची पाहणी केल्याने लवकरच या प्रकल्पाला गती मिळण्याची अपेशा वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com