Mumbai Local : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी!; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक
लोकने प्रवास करणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी. रेल्वे प्रशासन 13 तास जंबो मेगाब्लॅाक घेणार आहे. ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान पूल क्रमांक 12-13 वर पुनर्संचयित करण्याच्या कामासाठी हा ब्लॉक आहे. 24 डब्यांच्या लांब पल्ल्यांच्या मेल एक्सप्रेस गाड्या फलाट क्रमांक 12 आणि 13 वर देखील उभ्या करता याव्यात, यासाठी या फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सध्या मध्य रेल्वेवर सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, प्री नॉन इंटरलॉकिंगचे काम या दोन दिवसीय जंबो ब्लॉकदरम्यान केले जाणार आहे.
167 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हा ब्लॅाक शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यत असा दोन दिवसीय ब्लॅाक असणार आहे. त्यामुळे लोकल गाड्या या 15-20 मिनीटे उशीराने धावण्याची शक्यता आहे. जलद मार्गांवर धावणाऱ्या सर्व गाड्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे असा सल्ला रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला आहे.