व्हिडिओ
Chandrakant Patil Sangli : "मी राज्यातील सिनिअर मंत्री, ‘गृहमंत्री’पद फक्त राहिलंय..." पालकमंत्री चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील: 'गृहमंत्री’पद फक्त राहिलंय...' - सांगली पालकमंत्री पाटील यांचे वक्तव्य, राजकीय वर्तुळात पडसाद
तासगाव येथील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने सुमारे 4 कोटी 65 लाख रुपये खर्चून भव्य असे दुर्गामाता मंदिर उभारले आहे. या मंदिरात दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम सुरू आहे.
त्यानिमित्ताने आज महाआरतीचे आयोजन पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. महाआरतीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीयवर्तूळातून पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
"मी राज्यातील सिनिअर मंत्री आहे. जवळपास सर्व मंत्रिपदे मी भूषवली आहेत. ‘गृहमंत्री’पद फक्त राहिले आहे", असे विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शिवाय "शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने उभारलेले दुर्गामाता मंदिर सर्वांसाठी शक्तिस्थळ ठरेल", असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.