बीकेसीतील वाहतूक कोंडीतून वाहनांना काहीसा दिलासा मिळताना पाहायला मिळणार आहे. कारण बीकेसीतील 'मीसिंग लिंक' आजपासून सुरु करण्यात येणार आहे. २०० मीटर लांबीचा मीसिंग लिंक रोड वाहतुकीसाठी खुला केला जाणार असून मिठी नदीच्या किनाऱ्याला लागून मीसिंग लिंक रोडची उभारणी एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे
या भागात वाहनांना सिग्नल फ्री प्रवास करता येणार आहे. हा रस्ता सुमारे 200 मीटर लांबीचा असून, 18 मीटर रुंदीचा आहे. त्यावर प्रत्येकी 3 मार्गिका आहेत. आता बीकेसीमार्गे जे प्रवास करतात त्यांच्यासाठी ही महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.