MNS Avinash Jadhav: ठाण्यात मनसेला मोठा धक्का, अविनाश जाधव यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

अविनाश जाधव यांनी ठाण्यात मनसेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या निर्णयामुळे ठाण्यातील मनसेच्या राजकीय स्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता.
Published by :
Team Lokshahi

ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यामध्ये मनसेला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पराभवाची जबाबदारी घेत ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवत अविनाश जाधव यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. मात्र आता राज ठाकरे त्यांचा हा राजीनामा स्विकारतात का हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com