MNS Melava : उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरे यांचा कोणावर निशाणा ?

मनसे गुढीपाडवा मेळावा: राज ठाकरे यांचा निशाणा कोणावर? जाणून घ्या महापालिका निवडणुकीबद्दल महत्त्वाच्या घोषणा.
Published by :
Team Lokshahi

राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्याचे रणशिंग फुंकले आहे. हा मेळावा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित करण्यात आला असून मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये विविध घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यासर्व परिस्थितीवर राज ठाकरे आपली काय भूमिका मांडणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. या मेळाव्यात राज ठाकरे महापालिका निवडणुकांबद्दल महत्त्वाची घोषणा करणार असल्याची शक्यता समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com