व्हिडिओ
Raj Thackeray | भाजप- मनसे एकत्र येणार? शेलारांनंतर आता 'हा' नेता राज ठाकरेंच्या भेटीला
भाजप नेते मोहित कंबोज आणि आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करेल, अशा चर्चाणा उधाण आलं आहे. कारण भाजपचे आशिष शेलार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज देखील राज ठाकरे यांची भेट घेतली.
आशिष शेलार यांच्या भेटीनंतर लगेचच मोहित कंबोज यांनीदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. आता या दोन्ही भाजपा नेत्यांची राज ठाकरेंसोबत झालेली चर्चा आणि त्यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट ही एक सदिच्छा भेट असल्याचे म्हटले जात असले तरी यामागे येत्या पालिका निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याच्या सध्या चर्चा आहेत.