MSRTC Workers : आताची मोठी बातमी!, ST कर्मचाऱ्यांना उर्वरित 44% पगार मिळणार

एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित पगार: 44% पगार मिळणार, उपमुख्यमंत्री आणि परिवहन विभागाची तातडीची बैठक.
Published by :
Prachi Nate

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून, एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा उर्वरित 44% पगार मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. 7 एप्रिल रोजी केवळ 56 % पगार मिळला होता, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन वित्तविभागासोबत चर्चा केली. परिवहन मंत्री आणि परिवहन विभागाकडून तातडीने बैठक घेत एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज उर्वरित पगार एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com