Bhiwandi : Mumbai ATS : भिवंडीच्या पडघा नजीकच्या बोरिवली गावात मुंबई एटीएसची मोठी कारवाई

भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली येथे मुंबई एटीएस पथकाने कारवाई केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

(Bhiwandi) भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली येथे मुंबई एटीएस पथकाने कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीण व रायगड ग्रामीण येथे सुमारे 200 पोलीस पथकासह संपूर्ण गावात पहाटे 3 वाजल्यापासून अनेक घरातून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

यापूर्वी याच गावामधून कुख्यात साकिब नाचण त्याचा मुलगा व इसीस मधील दहशतवादी कृत्यात सहभागी 16 जणांना तर पुणे येथील प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आता किती जणांना ताब्यात घेतले आहे याबाबत माहिती मिळाली नाही आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com