Maharashtra Politics: संपूर्ण मुंबईत लागले फलक; मराठी माणसांकडून फलकबाजी, मनसेचा दावा
संपूर्ण मुंबईत मराठी माणसा मुंबई वाचव या आशयाचे फलक लागले आहेत. मराठी माणसांकडून हे फलक लावण्यात आल्याचा मनसेचा दावा केला आहे. पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते मराठी माणसा मुंबई वाचव अशा आशयाचे फलक लावले आहेत. हे पोस्टर जर मराठी माणून समोर येऊन लावत असेल तर त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना आभारी मानतो आम्ही.
मध्यतंरी एक कॅम्पियन चालवलं होतं देवाभाऊ म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मग ते कशासाठी होतं. जर मराठी माणूस एकत्र येऊन एकमेकांना साथ घालत असेल आव्हान करत असेल की आपण एकत्र यायला हवं आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, ही आपली शेवटची संधी आहे. अशाप्रकारच्या भावना जर मराठी माणसांमध्ये असतील तर त्यात वाईट काय? भारतीय राजकारण जे असतं किंवा समाजकारण हे निवडणूकीच्याचभवती फिरत असतं. निवडणुकीच्या तोंडावर जर अशा गोष्टी लागल्या तर त्यात गैर काय?
जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील आणि दोन्ही बंधूना मराठी माणसांची मतं मिळत असतील हे मागील अनेक निवडणुकीच्या आकडेवारीनुसार दिसतंय. मराठी माणसांची मतं दोन ठाकरे बंधूना मोठ्या प्रमाणात मिळतं. जर दोघं अकत्र असतील त्याची गोळाबेरीज केली तर नक्कीच फायदा दोन्ही बंधूना होईल ना. त्यामुळे हे जर त्यांना कळत नसेल हे केंद्रातील मंत्री असून तर आपल्या महाराष्ट्राचं दुर्देव आहे.
