मुंबई मनपा शाळांना 'अच्छे दिन', खाजगीकडून मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा
मुंबई महानगरपालिकेच्या मराठी भाषिक शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने शाळा बंद पडू लागल्या. यानंतर तत्कालीन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील शाळांच्या दर्जा सुधारण्याकडे लक्ष दिले. सरकारी शाळांमध्ये खाजगी शाळेंप्रमाणे शिक्षण देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठे बदल केले. यामुळे खाजगी शाळांमधून मनपाच्या शाळेत विद्यार्थी प्रवेश घेऊ लागले आहे. यावर्षी शाळा प्रवेशासाठी दुप्पट अर्ज आल्याने सीबीएसई शाळेंमध्ये लॉटरी काढून प्रवेश द्यावा लागला.
अशा आहेत मनपाच्या शाळा
मुंबई पालिकेच्या 1 हजार 150 शाळा
मुंबई पालिकेच्या 467 स्वमालकीच्या शालेय इमारती
मनपा शाळेत तीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी
2021-22 मध्ये 22 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश
2022-23 मध्ये 1 लाख दोन हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश
107 शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के
काय केला मनपाने बदल
पालकांचा कल पाहता इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुरवात
शाळांमधील शिक्षकांना इंग्रजीतून शिकवण्याचे प्रशिक्षण
सर्व शाळांना समान सामाजिक दर्जा, नावही मुंबई पब्लिक स्कूल
शाळांमध्ये चांगले बेंच, विद्यार्थ्यांना आवडणारे वातावरण
शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिक्षण
दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून टॅबद्वारे शिक्षण
सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा
माटुंगाच्या शाळेत केंब्रिज विद्यापीठाशी संबधित उपक्रम
काही वर्षांपुर्वी विद्यार्थी नसल्याने मनपाच्या शाळा बंद कराव्या लागत होत्या. आता एका जागेसाठी तीन-चार विद्यार्थ्यांचे अर्ज येत आहे. मुंबई मनपाने काळाची गरज ओळखून 11 शाळांना सीबीएसई तर एका शाळेला आयसीएसई बोर्डाचा दर्जा दिला. या 12 शाळांमधील 3849 जागांसाठी 9635 अर्ज आले. यामुळे लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागला. मानसिकता बदलली तर काहीही शक्य आहे, हे मुंबई मनपाच्या शालेय प्रशासन विभागाने दाखवून दिले…