Mumbai Talathi Exam : मुंबईत तलाठी परीक्षा सेंटरवर गोंधळ

परीक्षा केंद्रावर कुणीही नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबई: सध्या तलाठी परीक्षा या राज्यभर सुरू आहेत. त्यात मुंबईतील पवई आयटी पार्क सेंटरवर आज विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले असता, वेळेपूर्वीच गेट बंद करण्यात आले. प्रवेश न मिळाल्यामुळे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा गेटवर गोंधळ पाहायला मिळत आहे.

गेटवर परीक्षा केंद्रावरून या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातून मुंबईत परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आल्या पावली परताव लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com