व्हिडिओ
Nagraj Manjule: लेखक ,दिग्दर्शक नागराज मंजुळेंना ' महात्मा फुले समता पुरस्कार' जाहीर
प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना 'महात्मा फुले समता पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानासाठी हा सन्मान दिला जात आहे.
लेखक,दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळेंना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने 'महात्मा फुले समता पुरस्कार' जाहीर झाला आहे. 28 नोव्हेंबरला पुण्यात पुरस्कार सोहळा पार पडणार असून समता भूमी फुलेवाडा येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुरस्कार दिला जाणार आहे तर समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.