व्हिडिओ
Nana Patole VS Election Commission | निवडणूक आयोगाच्या कारभारवर आक्षेप, पटोलेंनी थेट व्हिडीओ दाखवला
निवडणूक आयोगाच्या कारभारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेप घेतला आहे. थेट व्हिडीओ दाखवत गंभीर आरोप केले आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतमोजणीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच या निवडणुकीत मतदारांचा टक्का कसा वाढला? याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. “मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचं दिसत असून याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, तसेच रात्री उशीरापर्यंत कोणत्या मतदान केंद्रावर मतदान सुरु होतं? हे निवडणूक आयोगाने सांगावं? राज्यात किती वाजेपर्यंत मतदान सुरु होतं? याचे फुटेज आम्हाला मिळायला हवे. ७६ लाख मतदानाची वाढ कशी झाली?”, असे अनेक सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत.