Nashik : नाशिक बाजार समिती बंद; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात एक दिवसीय संप

राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने बैठक घेऊन सोमवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने बैठक घेऊन सोमवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणताही शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात आणू नये असे आवाहन बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे. राज्य सरकारने कृषी व पणन कायद्यात बदल केले आहेत. सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजारतळ, उपबाजारतळ निर्माण करण्याचा, तसेच हमाल व मापारी या घटकांच्या विरोधात निर्णय घेतला असल्याचे बाजार समित्यांच्या संचालकांचे म्हणणे आहे. कायद्यातील बदलांमुळे शेतकरी, हमाल व मापारी या घटकांचे नुकसान होणार आहे. 2018 च्या विधेयक क्रमांक 64 अन्वये बदल करण्यात येऊ नये अशी मागणी बाजार समितीच्या प्रतिनिधींनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com