Nashik: ड्रग्ज प्रकरणात नाशिक पोलिसांची कारवाई

सोलापूर ड्रग्ज कारखान्यातील फरार असलेला तस्कर उमेश वाघ अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात आहे. विरार येथून उमेश वाघला नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिट 1 ने अटक केली आहे.
Published by :
Team Lokshahi

सोलापूर ड्रग्ज कारखान्यातील फरार असलेला तस्कर उमेश वाघ अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात आहे. विरार येथून उमेश वाघला नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिट 1 ने अटक केली आहे. ३ महिन्यापासून उमेश वाघ बंगलोर, केरळ, हैद्राबाद, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी लपून पळत होता. उमेश वाघ सोलापूर येथील कारखान्यात बनवलेले ड्रग्ज नाशिकच्या सनी पगारे याला विक्री करत होता. उमेश वाघ पोलिसांच्या हाती लागल्यानं राज्यातील ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणातील फॉर्म्युला देणारा उमेश वाघच्या मदतीने समोर येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com