Babanrao Tayawade: छगन भुजबळ यांच्या भूमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पाठिंबा नाही

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने नवीन अध्यादेश काढला. त्याच्या विरोधामध्ये ओबीसीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली.
Published by :
Dhanshree Shintre

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने नवीन अध्यादेश काढला. त्याच्या विरोधामध्ये ओबीसीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. तीन ठराव पास केले त्या ठरावाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे. त्यांनाही ठराव मंजूर नाही आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना देखील पाठीबा नसल्याचे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलेला आहे. ज्या दिवशी ओबीसीवर अन्याय झाला, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाला वाटेल त्या दिवशी आम्ही रस्त्यावरती उतरू आणि छगन भुजबळ यांना पाठिंबा देऊ अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com