Navnath Waghmare : 'जरांगे विधानसभेला उमेदवार उभे करू शकणार नाही'; नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल

ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगे विधानसभेला उमेदवार उभे करू शकणार नाहीत असं नवनाथ वाघमारे म्हणाले आहेत.

ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगे विधानसभेला उमेदवार उभे करू शकणार नाहीत असं नवनाथ वाघमारे म्हणाले आहेत. जरांगेंची 288 काय 88 उमेदवार उभे करण्याची कुवत नाही असे नवनाथ वाघमारे म्हणाले आहेत.

यापार्श्वभूमीवर नवनाथ वाघमारे म्हणाले, जरांगेंनी अर्ज जरी स्विकारायला सुरुवात केली असेल परंतु मी आज ही सांगू शकतो जे अर्ज करणारे तरुण आहेत किंवा जे उमेदवार आहेत. नक्कीच यांची येणाऱ्या काळात दिशाभूल झालेली आहे आणि चुकीच्या माणसाच्या नादी लागून त्यांचसुद्धा वाटोळचं होणार असं नवनाथ वाघमारे म्हणाले.

याचसोबत पुढे ते म्हणाले, जरांगे उमेदवार उभा करणार नाहीत त्यांच्यात तितका दम नाही. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांच्यात खरचं दम असेल तर त्यांनी फक्त 88 तरी उमेदवार उभे करून दाखवावेत असं मी त्यांना आव्हान करतो, असं वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com