Amravati: अमरावतीतली शिवपुराण कथा वादाच्या भोवऱ्यात

अमरावतीचे राणा दाम्पत्य यांची शिवपुराण कथा वादाच्या भोवऱ्यात अडकली असून बॅनरवर गौतम बुद्धांचा फोटो लावल्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावले गेले.
Published by :
Team Lokshahi

अमरावतीचे राणा दाम्पत्य आयोजित प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शिवपुराणच्या बॅनरवर गौतम बुद्धांचा फोटो लावल्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावले गेल्या. याला विरोध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. शिवपुराण कथेचे आयोजक खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा व लप्पी जाजोदीया यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली. राणा दाम्पत्याविरोधात गुन्हे दाखल न झाल्यास प्रदीप मिश्रा यांच्या कथा वाचण्याच्या कार्यक्रमाला उधळून लावण्याचा इशारा आंबेडकरी अनुयायांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com