Nawab Malik : नवाब मलिकांची आज जामीनावर सुटका होणार

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवाब मलिकांची जामीनावर सुटका होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवाब मलिकांची जामीनावर सुटका होणार आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला आहे.

नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर त्या आदेशाची प्रत आज सेशन कोर्टात त्यांची मुलगी घेऊन जाणार आहे. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो आदेश आर्थर रोड तुरुंगात जाईल. त्यानंतर तेथून कुर्ला येथील खासगी रुग्णालयात पाठवला जाईल. त्यानंतर नवाब मलिकांची जामीनावर सुटका होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com