राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु आहे. अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात येत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण येथे या यात्रेतील कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी जनसन्मान यात्रेनिमित्ताने जाहीर सभा होणार आहे. या सभेतून अजित पवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचे आहे. इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रासमोरील मैदानात अजित पवार जाहीर सभा घेणार आहेत.
यात्रेदरम्यान अजित पवार महिलांशी संवाद साधणार असून यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आदिती तटकरे, सूरज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.