Praful Patel: 'महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करणार' राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य

गोंदिया-भंडारा लोकसभेची जागा आपण लढणार का या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले की अनेक लोकांची इच्छा आहे की मी गोंदिया- भंडारा लोकसभेची जागा लढावावी.
Published by :
Team Lokshahi

गोंदिया-भंडारा लोकसभेची जागा आपण लढणार का या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की अनेक लोकांची इच्छा आहे की मी गोंदिया- भंडारा लोकसभेची जागा लढवावी. परंतु आम्ही सध्या महायुतीचे घटक आहोत, त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा जर आम्हाला मिळाली तर नक्कीच याबाबत आपण विचार करू पण आपण सध्या महायुतीचे घटक असल्यामुळे ज्या कुणालाही महायुतीमध्ये ही जागा जाईल त्याच्यासाठी योग्य काम करण्यास येईल.

अद्यापही महायुतीमधील जागा वाटपांचा तिढा हा सुटलेला नाही. याविषयी आज दिल्ली येथे महायुतीची बैठक आहे आणि त्यामध्ये आज किंवा उद्या जागा वाटपाचा तिढा हा सुटेल यासाठी आज मी दिल्लीला जात आहे. असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया येथे केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com