समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले; सुविधा आणि सुरक्षेवर प्रशासनाचा भर

नववर्ष स्वागताचा उत्‍साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे.

भारत गोरेगावकर, रायगड

नववर्ष स्वागताचा उत्‍साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे. प्रत्येकजण थर्टीफर्स्टसाठी वेगवेगळे प्लॅन करत आहेत. थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहेत. नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनार्‍यांवर गर्दी केलीय तर पर्यटकांच्या स्वागतासाठी स्थानिक प्रशासन व हाॅटेल व्यावसायिक देखील सज्ज झाले आहेत.

पॅरासिलींग, एटीव्ही राईड्स, जायंटबॉल सारख्या साहसी खेळांचीही तरूणाईला भुरळ घालतेय. राज्‍याच्‍या अनेक भागातून आलेले पर्यटक खास कोकण पद्धतीच्या व्‍हेज, नॉनव्‍हेज जेवणावर ताव मारत आहेत. बच्चे कंपनीही उत्साहात पाहायला मिळत आहे.

इथल्‍या ताज्‍या मासळीच्‍या आस्‍वादानेही पर्यटकांच्‍या जीभेचे चोचले पुरवले जाताहेत. पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाबरोबरच स्‍थानिक प्रशासनाने पर्यटकांना सुविधा आणि सुरक्षा देण्‍यावर भर दिलाय. समुद्र किनारपट्टी स्वच्छ करण्यात आली असून वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com