Yashomati Thakur On Nikhil Wagle: निखिल वागळेंना जीवे मारण्यासाठी हल्ला होता, यशोमती ठाकूरांचे विधान

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर काल पुण्यात हल्ला झाल्यानंतर आता यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत
Published by :
Team Lokshahi

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर काल पुण्यात हल्ला झाल्यानंतर आता यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत पत्रकार निखिल वागळे यांना जिवे मारण्याचा हा हल्ला होता असा आरोप केला, तर निखिल वागळे, ऍड असीम सरोदे व विश्वभर चौधरी यांच्या जीवाला काही झालं तर याला सरकार राहील तर महाराष्ट्राच्या चरित्राला डाग लावण्याचे काम सुरू आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निखिल वागळे यांना सुरक्षा देणार का असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com