Nitin Desai Case : नितीन देसाई प्रकरणातील आरोपींना अटक का नाही ?

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येला बावीस दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Published by :
Team Lokshahi

कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येला बावीस दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. नितीन देसाईंना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अजून अटक का केली नाही असा सवाल देसाई कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी एडलवाईज या फायनान्स कंपनीच्या पाच बड्या अधिकाऱ्यांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र याप्रकरणात अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

देसाई कुटुंबाने नितीन देसाई यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्यांना अटक करा आणि नितीन देसाई यांना न्याय द्या अशी मागणी केली आहे. पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य केल्यानंतरही या प्रकरणात दिरंगाई का होते असा थेट सवाल श्रीकांत देसाई यांनी उपस्थित करून त्या ऑडिओ रेकॉर्डिंग मीडियासमोर आणा, अशीही मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com