Sharad Pawar: ईडीकडून एकाही भाजप नेत्यावर कारवाई नाही; शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली!

ईडीचा गैरवापर केला जात आहे आणि राज्यातही तेच सुरु आहे, असं शरद पवार म्हणाले.
Published by :
Team Lokshahi

निवडणुकीची तारीख कधी जाहीर होईल याची आम्ही वाट बघत आहोत. निवडणूक आयोग संदर्भात शंका कशी घेतली गेली नाही? एका सदस्याने राजीनामा दिला, त्यामुळे यंत्रणेबद्दल काळजी वाटतं आहे. केंद्रीय यंत्रणाचा वापर ठीकठिकाणी केला जातोय. कर्नाटकमध्ये एका ज्येष्ठ नेत्याला अटक केली गेली. ईडीचा गैरवापर केला जात आहे आणि राज्यातही तेच सुरु आहे, असं शरद पवार म्हणाले.

अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली गेली. रोहित पवार यांच्यावर कारवाई केली जातेय. आरोप आहे की सरकारने साखर कारखाना विकायला काढला. दहशत निर्माण केली जात आहे. या सगळ्याची माहिती आम्ही मागवली. अॅक्टिव कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. सीबीआय आणि ईडीचा प्रभाव निवडणुकीवर पाडण्याचा प्रकार केला जातोय. १७ वर्षाचं काळ गेल्यानंतर ५९०६ ईडीच्या केसेस नोंदवल्या, चौकशी करून २५ रद्द केल्या. १४७ नेत्यांची चौकशी केली त्यात ८५ टक्के विरोधी पक्षाचे आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून आठ वर्षात १२१ नेत्यांची कारवाई करण्यात आली, असं शरद पवार म्हणाले.

कारवाई केलेल्यांमध्ये एक ही भाजप नेता नाही. ईडी भाजपचा सहकारी पक्ष आहे. ईडी कारवाई कधी करणार हे भाजपचे नेते सांगतात. याचे आदेश भाजप कार्यालयातून निघतात की काय असे वाटते. ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यावरची कारवाई थांबण्यात आली. इकडून तिकडून जाणाऱ्यांची चौकशी थांबली. हसन मुश्रीफ यांची चौकशी थांबली. अशी अनेक उदाहरणं आहे, असं शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com