व्हिडिओ
Trupti Desai | पुण्याला कुणीही विनाकारण बदनाम करत नाहीये- तृप्ती देसाई
पुण्याला कोणत्याही कारणाशिवाय बदनाम केले जात नाही, महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी असंवेदनशीलता दाखवू नये, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरण गंभीर आहे.
पुण्याला कोणीही विनाकारण बदनाम करत नाही, महिला अत्याचारासंदर्भात आपण किती असंवेदनशील आहोत हे तरी सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी दाखवू नये असं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराचं प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याचंही त्या म्हणाल्या. सत्ताधारी पक्षातील काही नेते, काही महिला यासंदर्भात पुण्याला विनाकारण बदनाम केलं असा आरोप करताय. या प्रकरणात तुम्ही गंभीर नाही पण असंवेदनशील आहात हे तरी दाखवू नका, पुणे बदनाम होऊ नये यासाठीआम्ही सगळे रस्त्यावर उतरत असल्याचंही तृप्ती देसाई म्हणाल्या.